तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.३१) : तालुक्यात कोरोनाचे संक्रमण अगदीच नियंत्रणात आले असून रुग्ण संख्याही पुरती आटोक्यात आली आहे. नविन रुग्ण आढळण्याचं प्रमाण अतिशय कमी झालं असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असून प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळं कोरोनाची साखळी तुटण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाची लाट आता ओसरू लागली असून नागरिकांना संसर्ग होण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. मागील काही दिवसांत अत्यंत कमी रुग्ण आढळले असून आज एकही कोरोना बाधित रुग्ण न आढळल्याने तालुकावासीयांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. तर कोरोना पूर्णतः नियंत्रणात आल्याने प्रशासनानेही सुटकेचा निश्वास टाकला आहे. कोरोना नियंत्रणाकरिता प्रशासनाने घेतलेल्या परिश्रमाचे फलित झाले आहे. आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसून ३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ९५ वर आले आहेत. आज आणखी दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ९२ झाला आहे. 
प्रशासनाच्या योग्य उपाययोजनांमुळे कोरोनाची परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आली असून कोरोना तालुक्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. आज तपासणी अहवाल प्राप्त झाले नसून ८० व्यक्तींच्या आज रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये एकही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. १९६ तपासणी नमुन्यांचे अहवाल अजून प्राप्त होणे बाकी आहे. ९५ ऍक्टिव्ह पोझटीव्ह रुग्णांपैकी १७ रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून ६१ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहे. तर १७ रुग्ण यवतमाळ व इतरत्र उपचार घेत आहे.


तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही Reviewed by सह्याद्री चौफेर on May 31, 2021 Rating: 5
Powered by Blogger.