सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वरोरा, (ता.३१) : समाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सन्मान्य जगणं जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं. या घटकांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं, दृष्टी दिली आणि संधीही दिली. या अफाट आणि अभूतपूर्व प्रयोगाचं जिवंत आणि चैतन्यमय प्रतीक म्हणजे ‘आनंदवन’! याच आनंदवनातील श्री. रमेश रामाजी क्षीरसागर हे आनंदवन संस्थेत मूकबधिर शाळेत कनिष्ठ लिपिक म्हणून ३५ वर्षे कार्यरत होते. त्यांनी आनंदवन संस्थेत एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून उत्तम काम केले. या प्रवासामध्ये त्यांना स्व. बाबा आमटे यांच्या सहवासात २५ वर्षे काम करता आले. ते आज दिनांक ३१ मे २०२१ ला सेवानिवृत्त झाले. मात्र,खरे आयुष्य सेवा निवृत्ती नंतरच सुरू होते.
श्री. क्षीरसागर यांचे सामाजिक कार्यासाठी असलेले समर्पण खरोखर प्रशंसनीय होते.
निवृत्ती काळात त्यांच्या आयुष्यात आनंद आणि सुख समृद्धी कायम राहो.
तुम्हाला अखंड सेवेनंतर मिळालेल्या आजच्या या
सेवानिवृत्तीच्या दिनी महाराष्ट्र राज्य धोबी (परीट) सामाज महासंघ सर्वभाषिक चंद्रपूर जिल्हा च्या वतीने हार्दिक शुभेच्छा..
कर्तृत्वान कार्यकर्ता झाला सेवानिवृत्त
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 31, 2021
Rating:
