खा. छत्रपती संभाजीराजे यांनी नव्या पक्षाचा विचार न करता रिपाई डेमोक्रॅटिक सोबत मिळून नेतृत्व करावे - डॉ. राजन माकणीकर


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (ता.३१) : छत्रपती शिवराय व राजर्षी शाहू महाराजांचा वारसा लाभलेले खा. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणा बाबत नवीन पक्ष स्थापनेचा विचार न करता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षा सोबत मिळून नेतृत्व करावे अशी इच्छा पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील खुल्या पत्रावरून पँथर चळवळीतील दिग्गजांनी म्हणजेच माजी आमदार दिवंगत टी.एम. कांबळे व भाई संगारे यांच्या पुढाकारातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या पक्षाची स्थापना होऊन एक नवा झंझावात निर्माण केला होता. 

पक्षाचे पितृतुल्य नेतृत्व काळाआड गेल्यामुळे पक्ष काही अंशी विस्कळीत झाला असल्याचे इतरांना वाटत होते मात्र,पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांनी आपल्या युवा खांद्यावर जवाबदारी घेऊन पक्ष सावरला आहे. आज राज्यात पक्षाची ताकत वाढू लागली आहे.

खा. संभाजीराजे यांनी पक्षा सोबत येऊन नेतृत्व स्वीकारल्यास देशातील तमाम बहुजन एकत्र येऊन सत्ताकारणात आमुलाग्र बदल घडवतील व शिवराय फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल.

मराठा आरक्षणाचा प्रश्न वरचेवर लांबणीवर जाणीवपूर्वक टाकला जात असून सत्ताधाऱ्यांना मराठा आरक्षण मिळू द्यायचे नाही आहे, असे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्यावरचा संघर्ष अटळ आहे. खा. संभाजी राजेंनी रिपाई डेमोक्रॅटिक पक्षा सोबत यावे आणि राजकारणात बदल घडवावा अशी इच्छा डॉ. माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे व्यक्त केली.
खा. छत्रपती संभाजीराजे यांनी नव्या पक्षाचा विचार न करता रिपाई डेमोक्रॅटिक सोबत मिळून नेतृत्व करावे - डॉ. राजन माकणीकर खा. छत्रपती संभाजीराजे यांनी नव्या पक्षाचा विचार न करता रिपाई डेमोक्रॅटिक सोबत मिळून नेतृत्व करावे - डॉ. राजन माकणीकर Reviewed by सह्याद्री चौफेर on May 31, 2021 Rating: 5
Powered by Blogger.