आदर्श शिक्षक व नाभिक समाजाचा जेष्ठ कार्यकर्ता हिरावला

 

सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
कोरपना, (ता.३१) : अख्ख आयुष्य समाजाला मार्गदर्शन करण्यात घालवलं. एक आदर्श शिक्षण म्हणून ते परिसरात ओडखले जात. निवृत्त होवून जेमतेम एक वर्ष होताच काळाने घात घातला आणि हृदय विकाराचा झटक्याने त्यांची ज्योत मात्र आज मावळली. त्यांचा जाण्याने नाभिक समाजात उणीव निर्माण झाली.

शेंडे सर हे एक आदर्श शिक्षक होते, हयात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. कोरपना तालुकासह जिवती पहाडावरील अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आपण गरीबितून समोर आलो आपला समाज सुध्दा पुढे यावा या हेतूने नाभिक समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी केले.

 सामाजिक जीवनात सक्रिय असतांना त्यांचा अचानक जाण्याने नाभिक समाजाचा मार्गदर्शक हिरावला. जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली समस्त प्राथमिक शिक्षक समिती तफेँ वाहण्यात आली.
आदर्श शिक्षक व नाभिक समाजाचा जेष्ठ कार्यकर्ता हिरावला आदर्श शिक्षक व नाभिक समाजाचा जेष्ठ कार्यकर्ता हिरावला  Reviewed by सह्याद्री चौफेर on May 31, 2021 Rating: 5
Powered by Blogger.