सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
चंद्रपूर : सामाजिक बांधिलकी जपत सांस्कृतिक परंपरांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने होपविंग्स सोशल फाऊंडेशन, चंद्रपूर यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘एक घर – एक पूजा थाळी’ या अभिनव उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या उपक्रमांतर्गत २५ लकी ड्रॉ विजेत्यांची घोषणा आज, बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याने सहभागी नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रत्येक घरात पूजा थाळी पोहोचविण्याच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम भारतीय संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरत आहे. नागरिकांनी या उपक्रमाला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल फाऊंडेशनच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या लकी ड्रॉच्या माध्यमातून २५ भाग्यवान विजेत्यांची निवड जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे विजेत्यांची नावे जाणून घेण्यासाठी सहभागी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. या घोषणेसाठी सर्व नागरिक आणि श्रद्धाळूंना उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
आजचा कार्यक्रम असा :- दिनांक : बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६- वेळ : दुपारी २ वाजता- स्थळ : विदर्भा इस्टेट-५, देवडा, चंद्रपूर
होपविंग्स सोशल फाऊंडेशनच्या डायरेक्टर तथा व्हाईस प्रेसिडेंट मनिषा वाकडे यांनी नागरिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहभागी विजेत्यांचे अभिनंदन करण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक उपक्रमांसोबतच सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करणाऱ्या या उपक्रमामुळे फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याला नवी दिशा मिळत आहे.
