सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : येथील देवा चिकन सेंटरचे संचालक तथा प्रभाग क्रमांक १३ मधील रहिवासी देवसिंग (देवा) महादेव कोवे (वय ४५) यांचे शुक्रवारी पहाटे ४ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.
गेल्या तीन वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. पुणे येथील खासगी रुग्णालयात त्यांच्या तोंडावरील कर्करोगाची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. प्रकृतीत सुधारणा होत असतानाच आजाराने पुन्हा डोके वर काढले आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाने मारेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.