टॉप बातम्या

गौराळ्यात स्वतंत्र विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : गौराळा गावातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी स्वतंत्र विद्युत ट्रान्सफॉर्मर (डीपी) बसविण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या सरपंच मयुरी चंद्रकांत धोबे यांच्या वतीने उपकार्यकारी अभियंता, मारेगाव यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

गौराळा येथील पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विद्युत ट्रान्सफॉर्मरवर सुमारे १५ ते २० बोरवेलचा भार असल्याने कमी व्होल्टेज आणि वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी, पाणीपुरवठ्याचे पंप व्यवस्थित चालत नसून ट्रान्सफॉर्मरचे फ्युज वारंवार जळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊन नागरिकांना पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे.

ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित विभागाने या मागणीची तातडीने दखल घेऊन नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();