टॉप बातम्या

मारेगावात खळबळ! विद्यार्थिनींची छेडछाड...


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : येथील स्व. चिंधुजी पुरके आश्रमशाळेतील काही विद्यार्थिनींसोबत छेडछाड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अधीक्षिका कीर्ती बावणे यांचे पती संजय बावणे यांच्याविरोधात मारेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून ८ ऑक्टोबर रोजी कीर्ती बावणे यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास वसतिगृहात प्रवेश करून पाचवी ते दहावीतील काही विद्यार्थिनींसोबत छेडछाड केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

मुख्याध्यापिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्सो कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();