टॉप बातम्या

नवरात्रोत्सवात ‘एक घर–एक पूजा थाळी’चा अनोखा उपक्रम; होपविंग्स सोशल फाउंडेशनचा पुढाकार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

चंद्रपूर : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक परंपरा, संस्कृती आणि कुटुंबातील सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी होपविंग्स सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘एक घर–एक पूजा थाळी’ हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील देवीच्या पूजेसाठी सजविलेल्या पारंपरिक किंवा आकर्षक पूजा थाळीचा फोटो काढून व्हॉट्सॲपवर पाठवायचा आहे. सहभागी होण्यासाठी ₹१११ इतके नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे. नोंदणीनंतर सहभागींचा २५ लकी ड्रॉ कूपनमध्ये समावेश करण्यात येईल. नोंदणीचा कालावधी ११ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०२६ असा असून, या उपक्रमाचा निकाल १८ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

उपक्रमातील निवडक छायाचित्रांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून प्रथम क्रमांकासाठी ₹३३३३ व ट्रॉफी, द्वितीय क्रमांकासाठी ₹२२२२ आणि तृतीय क्रमांकासाठी ₹११११ असे बक्षिसांचे स्वरूप आहे. तसेच सहभागी इतरांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात येणार आहेत.तसेच प्रसस्तीपत्र देण्यात येणार आहेत.

‘प्रत्येक घरात माता भवती... प्रत्येक मनात संस्कृती... आपली परंपरा, आपली संस्कृती’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात सर्व वयोगटातील महिला तसेच कुटुंबीय सहभागी होऊ शकतात. प्रत्येक घरातून एकच नोंदणी करता येणार असून निवड समितीचा निर्णय अंतिम राहणार आहे.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपल्या घरातील पूजा थाळी कलात्मक पद्धतीने सजवून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन होपविंग्स सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :  
सौ.मनीषा वाकडे
उपसंचालिका
होपविंग्स सोशल फाउंडेशन, विदर्भ एस्टेट-५, देवाडा, चंद्रपूर.
संपर्क -८३२९६ २४२१७/९२२६२०३९९५
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();