सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
चंद्रपूर : जिल्ह्यातील राजकीय आणि संघटनात्मक घडामोडींना गती देण्याच्या दृष्टीने भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाई – पिरिपा महायुतीचे अधिकृत उमेदवार महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर विठ्ठलराव कोहळे हे सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात वरोरा, राजुरा, बल्लारपूर आणि चंद्रपूर विधानसभा क्षेत्रांमध्ये विविध बैठका आयोजित करण्यात आल्या असून, शिक्षण क्षेत्रातील पदाधिकारी व शिक्षकांशीही ते संवाद साधणार आहेत.
दौऱ्याची सुरुवात सकाळी ११ वाजता वरोरा येथील शेतकरी भवनातून होणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता राजुरा येथील सेलिब्रेशन हॉलमध्ये बैठक होईल. दुपारी ३ वाजता बल्लारपूर येथील गोंडवाना बल्लाळशाह नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ५.३० वाजता चंद्रपूर येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात शिक्षण क्षेत्रातील विविध पदाधिकारी व शिक्षकांसोबत बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता नागपूर रोडवरील गौरव सेलिब्रेशन लॉन येथे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील कार्यक्रम पार पडणार आहे.
या दौऱ्याच्या माध्यमातून विविध विधानसभा क्षेत्रांतील पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर बांधवांशी संवाद साधला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीच्या दृष्टीने या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
"एक घर,एक पूजा थाळी उपक्रमात सहभागी होण्यासाठी Google form link : https://forms.gle/6V226V2EnuDe2yaL9
दौऱ्यातील सर्व कार्यक्रमांना संबंधित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे.

