सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : सण-उत्सवांच्या उत्साहात खादी आणि कॉटनचे कपडे खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी वणी येथे ‘जय महाराष्ट्र खादी कॉटन महासेल’ ही आकर्षक खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे. परवडणारे दर, कपड्यांचे विविध प्रकार आणि स्वदेशी वस्त्रांची उपलब्धता यामुळे या महासेलकडे ग्राहकांचे लक्ष वेधले जात आहे.
‘स्वदेशी घाला… खादीला जोडा!’ हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या महासेलमध्ये महिला व पुरुषांसाठी विविध प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, लेडीज खादी कुर्तीचे चार नग केवळ १,००० रुपयांत, तर खादी फुल शर्टचे चार नगही केवळ १,००० रुपयांत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. याशिवाय खादी हाफ शर्टसह विविध प्रकारच्या वस्त्रांचे पर्यायही उपलब्ध आहेत.
महासेलमध्ये लाईट शर्ट, मोदी कुर्ती, संग्राम पठाणी, पांढरा पायजमा, जॅकेट, जूट खादी शर्ट, पेपर खादी शर्ट, शर्ट व बंडी, नेहरू कुर्ती, बंगाली खादी, टॉवेल, रुमाल, खादी पँट आदी विविध प्रकारच्या कपड्यांचा समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार कपड्यांची निवड करता येणार आहे.
सणासुदीच्या काळात कुटुंबासाठी कपड्यांची खरेदी करताना दर्जा, विविधता आणि किंमत या बाबींना ग्राहकांकडून प्राधान्य दिले जाते. अशा वेळी खादी-कॉटनच्या कपड्यांवर उपलब्ध असलेले आकर्षक दर ग्राहकांसाठी विशेष संधी ठरत आहेत. स्वदेशी वस्त्रांच्या वापराला प्रोत्साहन देतानाच सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत कपडे उपलब्ध करून देणे, हे या महासेलचे प्रमुख आकर्षण आहे.
वणीकरांसह परिसरातील नागरिकांनी या महासेलला भेट देऊन खादी-कॉटनच्या कपड्यांच्या खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
महासेलचे ठिकाण व वेळ
नाव : जय महाराष्ट्र खादी कॉटन महासेल
पत्ता : जैताई मंदिराजवळ, यवतमाळ रोड, वणी.
वेळ : सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत.



