टॉप बातम्या

अंमली पदार्थांविरोधात वणी पोलिसांची मोहीम तीव्र; नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन

संग्रहीत छायाचित्र 

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : अंमली पदार्थांचा अवैध व्यापार, विक्री, साठवणूक व वाहतुकीला आळा घालण्यासाठी वणी पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. परिसरात गांजा, चरस, एमडी, हेरॉईन, कोकेन किंवा अन्य अंमली पदार्थांची विक्री अथवा वाहतूक होत असल्याची माहिती असल्यास ती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अंमली पदार्थांच्या गैरप्रकाराचा विशेषतः युवकांच्या आरोग्यावर आणि भवितव्यावर गंभीर परिणाम होत असल्याने पोलिसांकडून याविरोधात सातत्याने कारवाई केली जात आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात प्रभावी मोहीम राबविण्यात येत आहे.

नागरिकांकडे संबंधित व्यक्तीचे नाव, ठिकाण, वाहन क्रमांक, विक्री किंवा वाहतुकीची वेळ तसेच इतर कोणतीही माहिती उपलब्ध असल्यास ती पोलिसांना कळवावी. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे वणी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

माहितीसाठी संपर्क :
उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी – सुरेश दळवे : 9356462406
पोलीस निरीक्षक, पो.स्टे. वणी – भानुदास पिदुरकर : 9921794794
पोलीस सहायक निरीक्षक – अमरनाथ नागरे : 9651514751
पोलीस सहायक निरीक्षक – शिवाजी राठोड : 9422571589
पोलीस उपनिरीक्षक – साजीद सैय्यद : 
9822100094

अंमली पदार्थमुक्त समाजासाठी नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता पोलिसांना माहिती देऊन या मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहन वणी पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();