टॉप बातम्या

सहज सुचलं ग्रुपची आण, बाण, शान म्हणजे रंजु मोडके!

सह्याद्री चौफेर | किरण घाटे

चंद्रपूर : महाराष्ट्रातील नामांकित ‘सहज सुचलं’ व्हॉट्सॲप ग्रुपची सलग चार वर्षे मुख्य संयोजिका म्हणून यशस्वी धुरा सांभाळणाऱ्या रंजु दिलीप मोडके यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या समर्पित कार्याची दखल घेत मुख्य मार्गदर्शिका तथा नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे आणि ज्येष्ठ साहित्यिक ॲड. मेघा धोटे यांनी ‘रंजु मोडके म्हणजे सहज सुचलं ग्रुपची आण, बाण आणि शान!’ अशा शब्दांत त्यांचा गौरव केला.

मूळच्या तुकूम, चंद्रपूर येथील रहिवासी असलेल्या रंजु मोडके उच्चशिक्षित असून, शांत व प्रेमळ स्वभावासोबतच सामाजिक कार्यातील सक्रिय सहभागासाठी परिचित आहेत. योगशिक्षिका म्हणून कार्यरत असतानाच शहरातील विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांतही त्यांचा नेहमीच सहभाग असतो. सध्या त्या नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित दांडिया उत्सवात सहभागी झाल्या आहेत.

सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना यापूर्वी अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी मूल येथील पत्रकार भवनात लोकहितच्या वतीने आयोजित भव्य समारंभात त्यांना ‘कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता.

सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि नेतृत्वाच्या बळावर रंजु मोडके यांनी ‘सहज सुचलं’ ग्रुपमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();