सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : सहकार महर्षी अॅड. देविदासजी काळे यांच्या अमृत महोत्सवी वाटचालीचा प्रारंभ अभिष्टचिंतन सोहळ्याने उत्साहात झाला. सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी वणी येथील वसंत जिनिंग हॉलमध्ये आयोजित या सोहळ्यात मान्यवर, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
या सोहळ्याला आमदार संजय देरकर, वामनराव कासावार, डॉ. भालचंद्र चोपणे, मनसे नेते राजू उंबरकर, विजय बाबू चोरडिया, संजय खाडे, वसंत जिनिंगचे अध्यक्ष प्रमोद वासेकर, सुनील कातकडे, सौ.किरण देरकर, उत्तमराव गेडाम, चिखलगावच्या सरपंच सौ.रुपाली कातकडे, इजहार शेख, ओम ठाकूर, जय आबडा, विवेक मांडवकर, सुरेशराव बर्डे, अॅड. घनश्याम निखाडे, परीक्षेत एकरे, चिंतामण आगलावे, सुनील देठे, लिंगरेड्डी अंडेलवार, हरिशंकर पांडे, पुरुषोत्तम बदमवार, निमाताई जीवने, छायाताई ठाकूरवार, शंकरराव वराटे आणि सुनील वरारकर यांच्यासह अनेक मान्यवर व हितचिंतक उपस्थित होते.
उपस्थितांनी अॅड. देविदासजी काळे यांना निरोगी आयुष्य, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, तसेच त्यांच्या हातून यापुढेही समाजोपयोगी कार्य घडत राहावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. या अभिष्टचिंतन सोहळ्यातून त्यांच्याविषयीचा स्नेह, आदर आणि जिव्हाळा व्यक्त झाला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अॅड. देविदास काळे यांच्या मित्रपरिवाराने पुढाकार घेतला होता. उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. अमृत महोत्सवाच्या प्रारंभ सोहळ्यामुळे वणीतील मित्रपरिवार आणि हितचिंतकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.