नवे कोरे डिव्हायडर वर्षभरातच ढिले!

सह्याद्री चौफेर | किरण घाटे 

चंद्रपूर : मूल शहरात काही दिवसांपूर्वीच उभारण्यात आलेल्या नव्याकोऱ्या दुभाजकांची (डिवाइडर) अल्पावधीतच दैना उडाल्याचे समोर आले आहे. निर्माण कार्य पूर्ण होऊन काहीच काळ लोटला असताना, या दुभाजकांची दुरुस्ती व डागडुजी करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. 

निकृष्ट दर्जाचे काम आणि घाईगडबडीत उरकलेल्या बांधकामामुळे हे दुभाजक इतक्या लवकर खराब झाल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगत आहे.

विशेष म्हणजे, दुरुस्तीचे हे काम लपवण्यासाठी की काय, दुभाजकांना थेट बारदाणे व जुने कपडे गुंडाळून झाकून ठेवण्यात आले आहे. शहराच्या मुख्य रस्त्यांवरून जाणाऱ्या नारिकांच्या नजरेस पडणारे हे चित्र सध्या थट्टेचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे. "नवे ते नऊ दिवस" या म्हणीप्रमाणे नव्या दुभाजकांची ही अवस्था पाहून प्रशासनाच्या कारभारावर आणि कामाच्या दर्जावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

सार्वजनिक निधीचा असा अपव्यय करणाऱ्या ठेकेदारावर आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();