सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मौजा धामणी येथे शेतकऱ्यांसाठी हंगामपूर्व मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत बीजप्रक्रिया, एल निनोचा शेतीवरील संभाव्य परिणाम तसेच बियाण्याची उगवणक्षमता चाचणी या महत्त्वाच्या विषयांवर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी उपकृषी अधिकारी कोषटवार यांनी खरीप हंगामाचे नियोजन, पीक पद्धती आणि हवामान अंदाज याबाबत माहिती दिली. कृषी सेवक पवार व घोसाळकर यांनी बीजप्रक्रियेचे महत्त्व, औषधांची योग्य मात्रा व वापरण्याची पद्धत याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
सदर सभेचे आयोजन सहायक कृषी अधिकारी पी. ए. कचाटे यांनी केले होते. कार्यक्रमास गावातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करत खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
';
(function() {
var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true;
dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js';
(document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq);
})();