टॉप बातम्या

मार्डी येथे शून्य मशागत तंत्रज्ञानावर शेतकरी कार्यशाळेचे आयोजन


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : सोयागोल्ड फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड आणि भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत जिल्हा पांढरकवडा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी “शेतकरी कार्यशाळा, शून्य मशागत तंत्रज्ञान” या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा गुरुवार, दिनांक 28 मे 2026 रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता मार्डी येथील हनुमान मंदिर येथे पार पडणार आहे.

या कार्यशाळेत S.R.T. शेती तंत्रज्ञानाचे विशेष मार्गदर्शक  श्री अमोल वानखेडे तसेच रिधोरा येथील प्रगतीशील शेतकरी हरीश काळे हे शेतकऱ्यांना शून्य मशागत तंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धती, उत्पादन खर्च कमी करण्याचे उपाय आणि शेतीतील नवीन प्रयोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेऊन शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();