टॉप बातम्या

फावड्याच्या हल्ल्यातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील देवाळा येथे भाऊबंदकीतून झालेल्या फावड्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अनिल बाबाराव बावणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी सकाळी नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

काही दिवसांपूर्वी सुनिल बाबाराव बावणे याने कौटुंबिक वादातून त्याचा मोठा भाऊ अनिल बावणे याच्यावर फावड्याने हल्ला केला होता. गंभीर जखमी अवस्थेत अनिल बावणे यांना प्रथम मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूरमार्गे नागपूर मेडिकल कॉलेज येथे हलविण्यात आले होते.

गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी रात्री आठ च्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, या प्रकरणात आधीच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आता मृत्यूनंतर गुन्ह्याचे स्वरूप अधिक गंभीर होण्याची शक्यता असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();