| AI |
सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरातील अवैध जुगार अड्ड्यांवर वणी पोलीस प्रशासनाने धडक कारवाई करत चार आरोपींविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. ही कारवाई दिनांक 20 एप्रिल 2026 व 23 एप्रिल 2026 रोजी वणी भाजी मंडी परिसर व ब्राह्मणी फाटा परिसर येथे करण्यात आली.
पोलीसांनी छापेमारीदरम्यान आरोपी अतुल सुधाकर नक्षीने (रा. रंगारीपुरा, वणी), शेख फारुख शेख सलीम (रा. पंचशील वार्ड, वणी), अंश सावंत पासवान (रा. पंचशील नगर, वणी) आणि रेहान मोहम्मद हनीफ शेख (रा. पंचशील नगर, वणी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ४,३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वणी पोलीसांकडून सातत्याने गुप्त माहितीच्या आधारे विशेष पथके तयार करून अशा अवैध जुगार अड्ड्यांवर छापेमारी केली जात आहे. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पुढील काळातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
तसेच, नागरिकांनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.