टॉप बातम्या

राळेगाव येथे आदिवासी समाजाची बदनामी कारणा-यावर गुन्हा दाखल करा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

यवतमाळ- राळेगाव येथे पाच दिवसांच्या घडामोडी मध्ये झालेल्या विनाकारण आदिवासी मुलींची बदनामी झाली ही संपूर्ण आदिवासी समाजाची बदनामी झाली, त्यामुळे विश्रामगृह येथे आदिवासी समाजाच्या विविध संघटनेची बैठक २२ एप्रिल ला प्रा. वसंतराव कन्नाके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली .

बैठकी मध्ये सर्वानुमते राळेगाव येथे २६ एप्रिल ला पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन आदिवासी समाज करणार आहे.आदिवासी समाजाची बदनामी करणाऱ्या वर ॲट्रॉसिटी दाखल करा या प्रमुख मागणीसाठी आदिवासी समाज पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करणार आहे. 

यापुढे आदिवासी समाजावर अन्याय करणाऱ्या ला आदिवासी समाज माफ करणार नाही असा संदेश सर्व आदिवासी संघटनेच्या वतीने देण्यात आला. जिल्हातील प्रमुख आदिवासी संघटना यांनी आपल्या तालुक्यातील पदाधिकारी यांना राळेगाव येथे २६ तारखेला दुपारी १ वाजता उपस्थित राहाण्याचे आवाहन केले आहे. "अभी नहीं तो कभी नहीं" असा नारा देत सर्व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी एक झाले.

यावेळी अ. भा. आदिवासी विकास परिषद,ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, गोंडवाना गणतंत्र पार्टी,प्रधान संघटना,बिरसा ब्रिगेड, ग्राम स्वराज्य मंच, उलगुलान संघटना, शामादादा ब्रिगेड आदी संघटना व संघटनेचे पदाधिकारी या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी राजूभाऊ चांदेकर, बाळकृष्ण गेडाम, नरेश भाऊ गेडाम, डॉ. अरविंद कुडमेथे, मधुसूदन कोवे ,देवेंद्र आत्राम, प्रा. रवींद्र मेश्राम, डॉ .विलास कनाके, जीवन कोवे, दिलीप शेडमाके किरण कुमरे, सुरेश मेश्राम, तुषार आत्राम, बंडू मेश्राम ,अरुण पोयाम, राजेंद्र नागभिडकर ,अशोक गेडाम, शैलेश गाडेकर ,श्रीकृष्ण जीवन कोवे, प्रा.प्रफुल आडे ,संजय मडावी ,भीमराव मरसकोल्हे, पुरुषोत्तम घोडाम, निळकंठ वसंगे नंदकिशोर आडे, चेतन कन्नाके, गजानन आडे, निलेश वाघमारे, स्वरूप टेकाम, सचिन आत्राम,गणेश मरसकोल्हे ,पवन मंगाम ,आकाश चांदेकर व इतर समाज बांधव उपस्थित होते. प्रास्तावित राजुभाऊ चांदेकर यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार देवेंद्र आत्राम सर यांनी मानले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();