टॉप बातम्या

शासनाचे धोरण की घरकुल लाभार्थ्यांचे मरण?

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : नुकत्याच पार पडलेल्या तालुक्यातील पंचायत समितीद्वारे वार्षिक आमसभेत रेतीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. घरकुल लाभार्थ्यांना मिळणाऱ्या रेतीच्या गुणवत्तेवरून संताप व्यक्त होत असतानाच पंचायत समिती व महसूल विभागाने पुढाकार घेत आज सावंगी येथील गाळ मिश्रित रेती घाटावर शिल्लक असलेल्या रेती स्टॉकचा शुभारंभ करण्यात आला.

या वेळी लाभार्थ्यांशी साधक-बाधक चर्चेनंतर काही मोजक्या लाभार्थ्यांनी मोफत रेती स्वीकारली असली, तरी बहुतांश घरकुल लाभार्थ्यांनी माती मिश्रित रेतीकडे स्पष्टपणे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. “घर उभारणीसाठी निकृष्ट रेती उपयोगाची नाही, अशा रेतीमुळे घरकुलाचे स्वप्नच धोक्यात येईल,” अशी भावना अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास तहसीलदार उत्तम निलावाड, गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे, मंडळ अधिकारी वरठे, सरपंच अभिजित मांडेकर, तलाठी कुळमेथे, उपाध्ये, ग्रामपंचायत अधिकारी रेवतकर मॅडम यांच्यासह अन्य मान्यवर व मोठ्या संख्येने घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

दरम्यान, शासनाच्या धोरणामुळे घरकुल लाभार्थ्यांना दर्जेदार रेतीपासून वंचित राहावे लागत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत असून, “हे धोरण घरकुलांसाठी आहे की लाभार्थ्यांच्या अडचणी वाढवण्यासाठी?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();