सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : अदानी फाउंडेशन चांदा व पशुवैद्यकीय दवाखाना शिंदोला, कुरई व कोलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदोला परिसरातील कुर्ली, चनाखा, शिंदोला, येणाडी, गोवारी, येनक, कुरई व शिवणी या आठ गावांमध्ये जनावरांचे वंधत्व निवारण व आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
या शिबिरामध्ये एकूण १२९८ जनावरांवर उपचार करण्यात आले. यात वांझपण निवारण, गोचीड निर्मूलन, जंत निर्मूलन तसेच प्राथमिक उपचारांचा समावेश होता. अदानी फाउंडेशनच्या या विशेष पशु आरोग्य शिबिरामुळे परिसरातील पशुपालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जनावरांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढली आहे.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अदानी फाउंडेशनचे CSR हेड साई गौतम देवी, सीनियर प्रोजेक्ट ऑफिसर रुपेश कुकडे तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार बावणे (सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशुचिकित्सालय वणी), डॉ. सुभाष वानखडे (पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती वणी), डॉ. महेश डहाके, डॉ. रवी राठोड (पशुधन विकास अधिकारी), मनिष देवगडे व सचिन राजगडकर (पशुधन पर्यवेक्षक), वैभव मडावी (पशु सेवादाता) तसेच सुरज देवगडे (कृत्रिम रेतन तंत्रज्ञ) यांनी मोलाचे सहकार्य केले.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील पशुधन आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होत असल्याची भावना पशुपालकांनी व्यक्त केली.

