टॉप बातम्या

शेतकरी प्रश्नांवर बाळासाहेब शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांची रखडलेली घरे, जीवघेणा राज्य महामार्ग आणि अतिवृष्टीने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली आहे. तालुका प्रमुख विशाल किनेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देत प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली.

घरकुल मंजुरीनंतरही रेतीअभावी अनेक कुटुंबांचे घराचे काम अर्धवट असून, लाभार्थ्यांना तात्काळ रेती उपलब्ध करून द्यावी, अशी ठोस मागणी करण्यात आली. तसेच मार्डी–वणी राज्य महामार्गावरील फिस्की जंगल परिसरातील धोकादायक रस्त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असा इशाराही देण्यात आला.

यासोबतच २०२५-२६ मधील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी तत्काळ अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.

निवेदन देताना माजी उपसभापती तथा शिवसेना तालुका समन्वयक संजय आवारी,प्रशांतकुमार भंडारी (उपतालुका प्रमुख तथा उपसरपंच, वनोजादेवी), विभाग प्रमुख धनराज भट,शहर संघटक योगेश,गोविंदा मांढरे,शुभम आवारी, कार्तिक नेहारे,तन्मय सरोदे,तेजस कापसे, यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();