सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर थेट नगराध्यक्ष पदाचे अधिकृत महाआघाडी समर्थित उमेदवार डॉ. संचिता विजयराव नगराळे यांनी आज प्रभाग क्रमांक सहा मध्ये प्रचार दौरा केला. त्यांच्यासोबत नगरसेविका सौ. करुणा रविंद्र कांबळे आणि नगरसेवक श्री. अनिकेत अनिल बदखल उपस्थित होते.
प्रचारादरम्यान नागरिकांनी उमेदवारांचे मनापासून स्वागत करत मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. स्थानिक भागातील प्रश्न, विकासकामांची गरज आणि आगामी योजनांवर नागरिकांशी थेट संवाद साधताना तीनही उमेदवारांना मिळालेली साथ विशेषत्वाने जाणवली.
प्रचार दौऱ्यामुळे प्रभाग सहामध्ये निवडणुकीची रंगत अधिकच वाढली असल्याचे चित्र दिसून आले.