सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यावेळी प्रदेश संघटन सचिव रजाक पठाण, विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष अरबाज खान पठाण, जिल्हा उपाध्यक्ष समीर बेग, तालुकाध्यक्ष राजू वांढरे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, तालुका उपाध्यक्ष नरेंद्र लोणारे, भारत मालेकर तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. काजल शेख व नगरसेवक उमेदवारांसह एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष असीम हुसेन, प्रवक्ते तौसिफ खान, युवा नेते रेहान खान व रेहान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
आयोजित पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे जाताना "धनशक्ती च्या विरोधात जनशक्ती" म्हणून लढणार असल्याचे यावेळी भोयर यांनी सांगितले. अनुभवी काजल शेख ह्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार म्हणून पक्षातर्फे लढत आहे.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांकडे अनेकांचा कल आहे. पुढील नियोजन लवकरच कळवू असेही म्हणाले.

