टॉप बातम्या

शिवसेनेचा झेंडा वणी नगर परिषदेवर फडकवायचा आहे -पालकमंत्री संजय राठोड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शिवसेना (शिंदे) गटाची आढावा बैठक 21 नोव्हेंबर रोजी विनायक मंगल कार्यालयात पार पडली. पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आगामी निवडणुकांसंदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीत बोलताना पालकमंत्री राठोड म्हणाले की, “या वेळी शिवसेनेचा झेंडा आपल्याला भक्कमपणे फडकवायचा आहे. त्यासाठी पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने निवडणूक लढवावी लागेल.” प्रत्येक प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे असून, कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी उपस्थित सर्व उमेदवारांचा परिचय घेण्यात आला. प्रभाग प्रमुखांना विशेष सूचना देत संघटन मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला.
जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविताना सर्व कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करून विजय मिळवावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

बैठकीस हरिहर लिंगणवार, मा.सलीम केतानी, वणी नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार पायल तोडसाम, तसेच तिन्ही तालुक्यातील शिंदे सेनेचे तालुका प्रमुख तसेच पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();