सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी पोलीस स्टेशन हद्दीतील रांगणा येथे एका ३५ वर्षीय विवाहित इसमाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मृतकाचे नाव राहुल आनंदराव दुर्गे (वय ३५, रा. रांगणा) असे आहे. शनिवारी सकाळी त्यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. तब्येत बिघडल्याने त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय, वणी येथे सकाळी सुमारे १०.३० वाजता दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.