सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : कोरपना विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. देवराव दादा भोंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वणी शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या रक्तदान शिबिरात सामाजिक कार्यकर्ते, विदर्भ वार्ता पत्र व न्यूज चॅनेलचे संपादक तसेच दैनिक यवतमाळ मार्मिक चे प्रतिनिधी संजय चिंचोलकर यांनीही पुढाकार घेत रक्तदान करून जनसेवेचा आदर्श ठेवला.
रक्तदान ही सर्वश्रेष्ठ सेवा असल्याचे सांगत संजय चिंचोलकर यांनी, “समाजासाठी अशा उपक्रमात प्रत्येकाने सहभागी व्हावे,” असे आवाहन केले. शिबिरात मोठ्या संख्येने युवक, विविध संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले.

