टॉप बातम्या

वणीतील मिनी विधानसभेचा रणसंग्राम तापला: शिवसेना (शिंदे) पक्षाची ची रेकॉर्डब्रेक रॅली; हजारोंच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे

वणी : नगरपरिषदेच्या निवडणुकीत मिनी विधानसभेसारखी रंगलेली लढत आज आणखी चुरशीची झाली. शिवसेना (शिंदे) पक्षाने वणीत काढलेल्या भव्य नामांकन रॅलीने अक्षरशः रेकॉर्डब्रेक प्रदर्शन घडवले. शहराच्या चारही दिशांनी उमटलेल्या गर्दीच्या लाटा पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी हजेरी लावली, तर उमेदवारांनी या जनसमुदायाच्या साक्षीने आपले अर्ज दाखल केले.
रॅलीपूर्वी सर्व शिवसैनिकांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून त्यांना विनम्र वंदन केले. बाळासाहेबांच्या विचारांची शपथ घेताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लहर उसळली आणि जल्लोषात, घोषणांच्या गजरात रॅलीला शुभारंभ झाला.

अत्यंत अल्प अवधीमध्येच शिंदे गटाने वणीत आश्चर्यकारक वाढ नोंदवली असून स्थानिक राजकारणात दुसऱ्या क्रमांकाची भक्कम ताकद म्हणून उदयास आल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. “शिंदे पक्षाने शहवासियांचे मन जिंकले,” अशा शब्दांत नागरिक आणि समर्थक आपला प्रतिसाद जाहीर करताना दिसले. रॅलीदरम्यान वणी शहरात या एकाच चर्चेने तापमान वाढवले होते.
विशेष म्हणजे या शक्तिप्रदर्शनात महिला समर्थकांचा लक्षणीय सहभाग ठळकपणे जाणवत होता. महिलांच्या उत्साही उपस्थितीसोबत पुरुष कार्यकर्ता व पदाधिकारीही मोठ्या संख्येने सरसावत रॅलीला जोमदार रंग चढवला.

या रॅलीत वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील शिवसेना (शिंदे) चे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत उमेदवारांना भक्कम साथ दिली. रॅलीतील लोकसहभागाने आगामी निवडणूक लढतीची दिशा बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जात असून वणीचा राजकीय नकाशा नव्या समीकरणांकडे वळत असल्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत.



Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();