सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी शेतात जाणारे पांदन रस्ते हे जिवनरेखा आहेत. मात्र, आजही अनेक गावांमध्ये हे रस्ते खड्डेमय, बंद किंवा अडथळ्यांनी व्यापलेले असून शेतकऱ्यांना शेतात पोहोचण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आकापूर ते डोलडोंगरगाव या मार्गावरील पांदन रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. शेतकऱ्यांना पिकांची निगा राखण्यासाठी शेतात जाता येत नाही, वाहतुकीची साधने चालवणेही अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढत असून, त्यांनी शासनाकडे या रस्त्यांची दुरुस्ती व मोकळे करून देण्याची आग्रही मागणी आहे.
महाराष्ट्रात आता दुर्गम भागातही इंटरनेट पोहचणार असा नुकतेच महायुती सरकारने निर्णय घेतल्याचे जाहीर केले. मात्र “इंटरनेटपेक्षा शेतात जायला पांदन रस्ता हवा” अशी तीव्र भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. हा विषय केवळ रस्त्यांचा नसून, तो शेतकऱ्यांच्या जगण्याशी निगडीत आहे. शासनाने तातडीने या गंभीर विषयाची दखल घेऊन पांदन रस्त्यांची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.
"इंटरनेट आवश्यक आहे. मात्र, त्या पेक्षा शेतात जायला पांदण रस्त्याचे कामे महत्वाचे असून सध्या आकापूर ते डोल रस्त्याची अवस्था बिकट आहे. यामुळे शेतातील पीक शेतात आहे."संजय भिवाजी बलकी शेतकरी, लाखापूर