टॉप बातम्या

मारेगाव तालुक्यात मनसेच्या महिला उमेदवारांकडून जिल्हा परिषदेत प्रबळ दावेदारी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला नेत्यांकडून जोरदार तयारी सुरू असून पक्षाचे संघटन दिवसेंदिवस बळकट होत आहे. या निवडणुकीत सौ. सुषमा रूपेश ढोके, सौ. प्राजक्ता उदय खिरटकार आणि सौ. अर्चना वामन चटकी या तीनही कार्यकर्त्या मनसेच्या संभाव्य जिल्हा परिषद उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.

या तिन्ही महिला कार्यकर्त्या सामाजिक कार्यात सक्रिय असून स्थानिक प्रश्न, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. नागरिकांशी असलेला त्यांचा दांडगा संपर्क आणि मनसेच्या भूमिकेवरील त्यांचा विश्वास यामुळे त्यांची दावेदारी अधिक मजबूत मानली जात आहे.

त्यांच्या कार्यकौशल्यामुळे आणि जनतेशी असलेल्या थेट नात्यामुळे मारेगाव तालुक्यातील मनसे महिला आघाडीचा प्रभाव वाढत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

राजकीय वर्तुळात या तिन्ही संभाव्य उमेदवारांची नावं घेतली जात असून, मारेगाव तालुक्यात मनसेकडून महिलांची मजबूत उपस्थिती निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();