सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी पब्लिक स्कूलची दहावीची विद्यार्थिनी कु. योगेश्वरी प्रशांत डोनेकर हिने यवतमाळ येथे आयोजित जिल्हास्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कु. योगेश्वरीने शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. सय्यद अदनान यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर प्रशिक्षण घेतले. स्पर्धेत तिने दाखवलेले असामान्य कौशल्य, आत्मविश्वास आणि खेळाडूवृत्ती यामुळे तिने विजय मिळवला.
या यशाबद्दल बोलताना योगेश्वरी म्हणाली, “माझ्या शाळेचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. हा विजय मला अधिक उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा देतो.”
शाळेचे प्राचार्य राकेश कुमार देशपांडे यांनी तिचे अभिनंदन करताना सांगितले की, “योगेश्वरीच्या समर्पणाचा आणि मेहनतीचा आम्हाला अभिमान आहे. ही कामगिरी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त प्रतिभेला प्रोत्साहन देणारी ठरेल.”
संस्थेचे सचिव श्री. ओमप्रकाशजी चचडा सर व सदस्य श्री. विक्रांत चचडा यांनी योगेश्वरीचा सत्कार करून तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कु. योगेश्वरीच्या या उल्लेखनीय यशामुळे वणी पब्लिक स्कूलचा लौकिक अधिक उजळला असून, परिसरातून तिच्यावर अभिनंदनाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.