सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी शहरात सातत्याने होत असलेल्या अनियमित व अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. चार-पाच दिवसांनी नळाला पाणी येत असल्याने नागरिकांना पिण्यासाठी कॅनने पाणी विकत घ्यावे लागत असून सर्वसामान्यांवर आर्थिक ओझे वाढले आहे.
वणी नगरपालिकेकडून दरवर्षी पाणीकर आकारला जात असताना शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा न केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे शहरात ‘कॅन माफिया’ सक्रिय झाल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
या संदर्भात मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन, “पालिकेने तत्काळ पाणी समस्येवर उपाययोजना न केल्यास मनसेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा दिला आहे.