टॉप बातम्या

ब्रेकिंग न्यूज...विजय बाबू चोरडिया यांची शिवसेनेच्या जिल्हा संघटकपदी नियुक्ती

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे

वणी : वणी शहरातील समाजसेवक, दानशूर व्यक्तिमत्व आणि नुकतेच शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केलेले विजयबाबू चोरडिया यांची शिवसेना पक्षाच्या जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री मा.ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, शिवसेना सचिव संजय पुष्पलता भाऊराव मोरे यांनी नियुक्तीपत्राद्वारे केली.

या निमित्ताने बोलताना विजयबाबू चोरडिया म्हणाले की, 
“वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण मी जनमानसात पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवसेना पक्ष अधिक मजबूत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करीन.”

विजयबाबू चोरडिया यांनी आपल्या या नियुक्तीचे श्रेय मा.ना. संजय राठोड (पालकमंत्री, यवतमाळ जिल्हा), विश्वास नांदेकर (चंद्रपूर-आर्णी लोकसभा समन्वयक) आणि शिवसेना नेते विनोद मोहितकर यांना दिले असून त्यांनी या सर्व वरिष्ठ नेत्यांचे विशेष आभार मानले.

चोरडिया यांच्या या नियुक्तीने यवतमाळ,वणी व राळेगाव विधानसभा क्षेत्रात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();