टॉप बातम्या

वणीत जनता दरबार आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा ६ नोव्हेंबरला

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे

वणी : वणी शहरातील वाढत्या नागरी समस्या आणि प्रशासनातील निष्क्रियतेच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या तक्रारी व अडचणी सोडविण्यासाठी ‘जनता दरबार’ तसेच भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन चंद्रपूर आर्णी लोकसभा क्षेत्राचे समन्वयक विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत जनता दरबार आणि त्यानंतर ३ ते ५ वाजेपर्यंत पक्षप्रवेश सोहळा अशा दोन टप्प्यांत पार पडणार असल्याची माहिती शिवसेना नेते विजय चोरडिया यांनी दिली.

शहरात गेल्या चार वर्षांपासून नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये प्रशासकीय कारभार सुरू असल्याने नागरिकांच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून तातडीची कामे होत नसल्याने आणि काही ठिकाणी मनमानी कारभारामुळे जनतेत नाराजीचे वातावरण आहे. अशा वेळी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. संजय राठोड यांच्या संकल्पनेतून हा जनता दरबार आयोजित करण्यात आला असून, नागरिकांच्या तक्रारींवर थेट चर्चेद्वारे निर्णय घेण्यात येणार आहे.

वणीतील नागरिकांनी आपले प्रश्न आणि अडचणी मांडण्यासाठी शिवसेना जनसंपर्क कार्यालय, वणी विधानसभा (घर संसार सेल जवळ, जैन मंदिर समोर) येथे संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना नेते विजय चोरडिया यांनी केले आहे. तसेच संपर्कासाठी राजू रिंगोले (मो. 92848 81655) आणि विक्की बोलचेटवार (मो. 99221 65885) या क्रमांकांवर नागरिकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमामुळे वणीतील नागरिकांना त्यांच्या समस्यांचे निवारण होण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ मिळणार असून, शिवसेनेच्या या उपक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();