टॉप बातम्या

मारेगाव : कुंभा सर्कलमधून भैय्याजी अंबादास कनाके पंचायत समितीच्या रिंगणात

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगावसामाजिक क्षेत्रात सर्व समाजाची जाण असणारे आणि प्रशासनापुढे जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारे भैय्याजी अंबादास कनाके हे आगामी पंचायत समिती निवडणुकीत कुंभा सर्कलमधून उमेदवारी दाखल करणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.

गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या कनाके यांनी सर्वसामान्य जनतेच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले असून, अन्याय-अत्याचाराविरोधात ठामपणे भूमिका घेत त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला आहे.

कुंभा सर्कलच्या विकासासाठी ठोस विकासात्मक धोरण आणि लोकसेवेचा संकल्प घेऊन कनाके यांनी या निवडणुकीत उतरायचे ठरवले आहे. त्यांच्या नेतृत्वात लोकांना एक आश्वासक आणि खंबीर पर्याय मिळत असल्याचे मत कार्यकर्त्यांमधून व्यक्त केले जात आहे.

आगामी पंचायत समिती निवडणुकीत कुंभा सर्कलमध्ये प्रस्थापितांना कडवे आव्हान मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. भैय्याजी कनाके यांच्या मैदानात उतरल्यामुळे या निवडणुकीचा रंगतदार सामना होणार असून, प्रस्थापितांची झोप उडणार यात शंका नाही.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();