टॉप बातम्या

महाविकास आघाडीचा दमदार शक्ति प्रदर्शन..भव्य रॅलीत उमेदवारांचे नामांकन दाखल; वणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आज वाजत–गाजत, जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली काढत आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले. निवडणूक जिल्ह्यात रंगू लागली असताना आघाडीच्या या भव्य शक्ति प्रदर्शनाने वणी शहरात चांगलीच चर्चा रंगली.
ढोल–ताशांच्या गजरात, घोषणांच्या जयघोषात रॅली शहरातून फिरताच वातावरणात निवडणुकीचा उत्साह उसळला आणि संपूर्ण शहर सणासारखे उजळून निघाले.आघाडी च्या सर्व उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली. दरम्यान, विरोधकांना रोखण्यासाठी आजपासूनच कंबर कसल्याचे सहभागी मान्यवरांनी माध्यमाना सांगितले. 
या रॅलीत शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि मनसे या आघाडीतील प्रमुख नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले. पक्षनेत्यांनी उमेदवारांना शुभेच्छा देत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा संदेश दिला. महाविकास आघाडीच्या या एकत्रित शक्तिप्रदर्शनामुळे आगामी वणी नगरपरिषद निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();