टॉप बातम्या

वणीमध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाची अभूतपूर्व शक्ती-सभा; उद्या नगरपरिषद नामांकनासाठी सर्व शिवसैनिक सज्ज

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे

वणी : शिवसेना (शिंदे) पक्षाची भव्य आणि अभूतपूर्व सभा वणीच्या एस.बी. लॉन सभागृहात शनिवारी रात्री 9.30 वाजता उसळत्या उत्साहात संपन्न झाली. प्रचंड गर्दी, घोषणांचा गजर आणि भगव्याच्या लाटेमुळे सभेला विजयी जल्लोषाचे स्वरूप प्राप्त झाले. विशेष म्हणजे महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती, तर पुरुष कार्यकर्त्यांनीही सभेला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.

सभेत शिवसेना नेत्यांनी विरोधकांवर जोरदार तोफ डागत पाणी प्रश्न, अतिरिक्त लादलेल्या करांचे धोरण आणि जनतेला भेडसावणाऱ्या अनेक मुद्द्यांवर विरोधकांचे अपयश भरभरून उघड केले. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर अपयशी ठरलेल्या विरोधकांना सभेतून जोरदार खडे बोल सुनावण्यात आले.
“वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घराघरात पोहोचवू”
सभेत शिवसैनिकांना प्रेरणा देताना स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची महती सांगण्यात आली. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने शिवसेना अधिक बळकट होत असल्याचे नेत्यांनी सांगितले.

“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपल्या लाडक्या बहिणींसाठीची तळमळ”
शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या “शिवसेनेच्या भगिनींसाठी असलेली जिव्हाळ्याची तळमळ” विशेषतः अधोरेखित करण्यात आली. त्याच भावनेतून वणी नगरपरिषदेत भगवा झेंडा फडकवण्यासाठी सर्व प्रभागात एकदिलाने सज्ज व्हावे, असे आवाहन करून निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले.
उद्या नगरसेवक व नगराध्यक्ष नामांकन दाखल करणार
या सभेनंतर उद्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार एकाच दिवशी नामांकन दाखल करणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे वणीतील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
शेकडो नागरिकांचा पक्षप्रवेश
जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी सभेत शिवसेना (शिंदे) पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. नव्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येने झालेले हे पक्षप्रवेश शो ऑफ स्ट्रेंथ ठरले.

सभेला शिवसेना (शिंदे) पक्षाचे जिल्हा समन्वयक हरिहर लिंगमवार, जिल्हा संघटक विजय चोरडिया, विनोद मोहितकर, सुनिल नांदेकर, सौ. किरणताई विश्वास नांदेकर, विक्रांत चचडा, शुभम गोरे, मारेगाव तालुका अध्यक्ष विशाल किन्हेकर, पदाधिकारी, महिला पदाधिकारी, शहर ग्रामीण कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभा यशस्वी ठरवून वणी नगरपरिषद निवडणुकीसाठी शिंदे गटाने जोरदार ताकद दाखवली.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();