टॉप बातम्या

राजूर येथे धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन रॅली

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : आदिवासी जनजागृती युवा संघटना व विरांगना राणी दुर्गावती महिला संघटना यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोज शनिवारला राजूर येथे क्रांतीसुर्य धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती निमीत्त राजूर येथे भव्य अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 

या रॅलीची सुरुवात वीरांगणा राणी दुर्गावती यांच्या पुतळ्याला अभिवादन करून राजूर इजारा येथून करण्यात येऊन सम्राट अशोका बुद्ध विहार मार्गे राजूर येथील बिरसा भूमी येथे महामानवांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रॅली बिरसा मुंडा नगर, राजीव गांधी चौक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक, दीक्षाभूमी बुद्ध विहार, भगतसिंग चौक, दीक्षाभूमी मार्गे जाऊन बिरसा भूमी येथे रॅलीचे समारोप करण्यात आले. 

या रॅलीत मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव व राजूर गावातील सर्व समाज बांधव सहभागी होते. या रॅलीचे सम्राट अशोका बुद्ध विहार राजूर इजारा व बिरसा मुंडा नगर येथे स्वागत केले. यावेळी बिरसा मुंडा नगर येथे ॲड. अरविंद सिडाम यांनी रॅलीत सहभागी समाज बांधवांना संबोधीत केले. विशेष म्हणजे रॅलीच्या सुरवातीला बोदाड येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला व भीमालपेण भिवसन यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सरतेशेवटी संघटनेद्वारा भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी मित्रपरिवार ॲड दिपक मस्के, सावन बहादे, राजेश बोलगलवार, अमित करमरकर, स्नेहल वाळके, विशाल सोनेकर, जय बहादे आदींनी मदत केली.

या अभिवादन रॅलीस यशस्वी करण्याकरिता ॲड. अरविंद सिडाम, मारोती आत्राम, रामकृष्ण सिडाम, राजू पंधरे, संदिप सिडाम, रोहीत किनाके, दिपक कनाके, कृष्णा मेश्राम, रुपेश नैताम, उज्वल कुमरे, रुपेश मेश्राम, साई दुर्वे, जय किन्नाके, स्वप्नील किल्लेकर, जगण सुरपाम, मनोज परचाके, बादल मेश्राम, शुभम मेश्राम, आदु तोडसाम, लकी सुरपाम, न्यानदीप पेंदोर, विजय गडे, किसन किनाके, गणेश कोवे, विजय उईके, पीयूष घोडाम, सूरज पेंदाम, सुदर्शन कुमरे, सानिका नैताम, निशा कुमरे, श्रावणी मेश्राम, लक्ष्मी कन्नाके, साक्षी येरकाडे, गायत्री कन्नाके, श्वेता टेकाम, मीनाक्षी पंधरे, कोयल कुमरे, काजल किनाके, कोमल पोयाम, श्रेया पेंदाम आदिवासी जनजागृती युवा संघटना व विरांगणा राणी दुर्गावती महिला संघटना यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ता व समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();