टॉप बातम्या

ओबीसी चळवळीतील बहुआयामी नेतृत्व — प्रवीणभाऊ खानझोडे

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे

वणी : संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या वैचारिक वारशातून प्रेरणा घेत न्याय-समता-बंधुता या मूल्यांवर आधारित जीवन जगणारे, फुले,शाहू,आंबेडकरी विचारसरणीचे जाणीवपूर्वक पालन करणारे प्रवीणभाऊ खानझोडे हे वणी मतदारसंघातील एक आदर्श, बहुआयामी सामाजिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा दृढ पगडा अंगी बाळगून प्रवीणभाऊ यांनी ओबीसी चळवळीत उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांची जीवनशैली, कार्याची दिशा आणि सामाजिक बांधिलकी पाहून अनेक कुटुंबांनी त्यांना प्रेरणास्त्रोत मानत स्वत:चा मार्ग निवडला आहे. पदाचा बडेजाव न करता, “पद ही लोकाभिमुख सेवा करण्याची संधी” या तत्त्वावर काम करणारे प्रवीणभाऊ हे चालते–बोलते आंबेडकरी चळवळीचे खरे प्रतिनिधी मानले जातात.

विद्यार्थीदशेपासूनच विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून ते सक्रिय झाले. जात-धर्माच्या पलीकडे जाऊन दिन-दलित, गरजू, वंचित समुदायाची सेवा करणे हेच जीवनाचे ध्येय त्यांनी स्वीकारले. दिलेल्या शब्दाला प्राणपणाने उभे राहणारा, संकटात साथ देणारा विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ख्याती निर्माण झाली आहे.

राजकीय प्रवासात त्यांनी राजुर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून सुरुवात करत पंचायत समितीच्या उपसभापती पदापर्यंत मजल मारली. “महिला सक्षम झाल्या पाहिजेत तर त्या स्वतःच्या घरातूनच उभ्या राहिल्या पाहिजेत” या भूमिकेतून त्यांनी 2010 मध्ये आपल्या पत्नी, आदरणीय सौ. वृषालीताई प्रवीण खानझोडे यांना सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय करण्याची जबाबदारी स्वतः पार पाडली. त्यांच्या मागे उभे राहून त्यांचे नेतृत्व अधिक प्रखर होण्यासाठी प्रवीणभाऊ यांनी निःस्वार्थी आधार दिला.

बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून विविध पदांवर राहून त्यांनी व्यापक जनसंपर्क, निस्वार्थ सेवा आणि सर्वसमावेशकतेचा ठसा उमटवला आहे. मतदारसंघातील सर्व स्तरातील लोकांशी त्यांनी राखलेला जिव्हाळ्याचा संबंध, त्यांचा त्याग, कष्ट आणि मनाला आपलेसे करणारा स्वभाव यामुळे आज प्रत्येक गावात, प्रत्येक समाजघटकात प्रवीणभाऊंचा प्रभाव दृढ आहे.

“माणूस एकदा जन्माला आला की मृत्यू ठरलेलाच असतो, पण आयुष्य समाजासाठी जगावे” हे तत्त्व अंगीकारून प्रवीणभाऊ खानझोडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केले. पुढील सामाजिक व राजकीय प्रवासात ते मतदारसंघातील आशादायी, समर्पित आणि लोकाभिमुख सामाजिक व्यक्तिमत्त्व म्हणून अधिक प्रखरपणे उदयास येत आहेत.

आज प्रवीणभाऊ खानझोडे यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या अगणीत मित्र परिवारातर्फे शुभेच्छा..!!

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();