सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रदेश संघटक सचिव (सा. न्याय) पदावर कार्यरत असलेल्या एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने जिल्हा संघटनेत खळबळ उडाली आहे.
दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी पंडितजी कांबळे, प्रदेश अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, यांच्या सेवेशी विजय नगराळे (प्रदेश संघटक,सामाजिक न्याय विभाग यवतमाळ) या पदाधिकाऱ्यांनी आपला औपचारिक राजीनामा सादर केला. “वैयक्तिक कारणास्तव यापुढे पक्षामध्ये कार्य करणे शक्य नाही. त्यामुळे माझ्या पदाचा राजीनामा स्वीकृत करण्यात यावा,” असे त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
पक्षाने दिलेला मान, जबाबदाऱ्या आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा विश्वास याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “पक्षाने मला भरपूर मान-सन्मान दिला, याबद्दल मी सदैव ऋणी आहे,” असे ते राजीनामा पत्रात नमूद करतात.
या राजीनाम्याची प्रत जिल्हाध्यक्ष मा. अफजल फारुखी (जिल्हा निरीक्षक तथा प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्याक सेल, यवतमाळ) यांनाही देण्यात आली असून, राजीनाम्यामुळे पक्षाच्या स्थानिक संघटनेत चर्चा रंगल्या आहेत.



