टॉप बातम्या

शिंदे साहेबांचा विश्वास: वणी नगर परिषद निवडणुकीची धुरा विश्वासभाऊ नांदेकर यांच्या हाती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने, तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषद व नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने ‘निवडणूक प्रभारी’ पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

या नियुक्त्यांमध्ये वणी नगर परिषदेच्या निवडणूक प्रभारीपदी माजी आमदार विश्वास नांदेकर यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीद्वारे स्थानिक स्तरावर संघटन अधिक बळकट करण्यास आणि निवडणूक तयारीला चालना देण्यास मदत होणार आहे.

या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, वणी तालुक्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने जोरदार तयारीचा बिगुल फुंकला आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();