टॉप बातम्या

अंकुश बोढे यांची भाजपमध्ये एन्ट्री; वणीच्या राजकारणात मोठी खळबळ

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणीच्या राजकीय वातावरणात आज अचानक मोठी उलथापालथ झाली. मनसेचे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले अंकुश बोढे यांनी पक्षाशी संबंध तोडत भाजपचा झेंडा हातात घेतला. त्यांच्या या निर्णयाने स्थानिक राजकारणात चर्चा आणि अंदाजांना जोर आला आहे.

मागील काही महिन्यांपासून वणीमध्ये मनसेची पकड वाढवण्यासाठी बोढे सक्रिय होते. विविध सामाजिक उपक्रम, बैठका आणि संघटनात्मक मोहिमा यामधून त्यांनी स्वतःची छाप निर्माण केली होती. मात्र, संघटनेतील काही अंतर्गत मतभेद आणि आगामी निवडणुकांतील अनिश्चितता यामुळे त्यांनी नवा राजकीय मार्ग स्वीकारल्याची चर्चा आहे.

भाजपमध्ये प्रवेश करताच जिल्हा नेतृत्वाने त्यांचे औपचारिक स्वागत केले. पक्षात त्यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती असून, त्यांच्या येण्याने भाजपची स्थानिक ताकद वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बोढे यांच्या निर्णयामुळे वणीतील राजकारणाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे चित्र आहे. युती मुळे मनसेमध्ये नाराजीचे सूर उमटत असतानाच भाजपात उत्साह वाढला आहे. नगरपरिषद निवडणूक जवळ येत असताना या घटनेमुळे संपूर्ण राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();