टॉप बातम्या

तळागाळातील लोकांचा आवाज… 35 वर्षांपासून धार्मिक-राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेलं नाव "सुरेशदादा"

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच वणी परिसरात एकच नाव मुक्त कंठाने उच्चारले जात आहे “भाऊला निवडणुकीत उभे करु… तळागाळातील लोकांचा आवाज म्हणजे सुरेशदादा!” कोणतीही रात्र असो, कोणतीही परिस्थिती असो… लोकांच्या मदतीसाठी तत्पर धावून जाणारा खरा माणूस, खरा नेता म्हणून सुरेशदादांची ओळख सर्वदूर पसरलेली आहे.

विद्यार्थीदशेपासूनच म्हणजे ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशन जिल्हाध्यक्ष पद मिळाले आणि राजकारणाची ओढ असलेल्या सुरेशदादांनी भाकपामध्ये दीर्घकाळ कार्य करत दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य, तसेच तंटामुक्त अध्यक्ष, नांदेपेरा विहार समिती ही जबाबदारी समर्थपणे निभावली. शेतकऱ्यांच्या प्रत्येक लढ्यात लाल बावटा खांद्यावर घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या या नेत्याने सलग 35 वर्षे भाकपाच्या माध्यमातून जनसेवा केली.

सन 2017 मध्ये पत्नी सौ. चंद्रज्योती सुरेश शेंडे यांना राजकारणात उतरवत पंचायत समिती वणीवर भाकपाचा झेंडा फडकवला व पं.स. सदस्य तसेच उपसभापती पद यशस्वीपणे भूषवले. उच्चशिक्षणात एम.ए. (राज्यशास्त्र) घेतलेल्या सुरेशदादांचे राजकीय डावपेच, जनसंपर्क, आणि नियोजन कौशल्य सर्वांना वाखाणण्यासारखे आहे.

आज वणीमध्ये (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष वाढत्या जोमाने मजबूत होत असून विद्यमान आमदार श्री. संजय देरकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा ओघ वाढत आहे. त्यातच सुरेशदादांनीही उबाठाची कास धरत आपली राजकीय मोट अधिक भक्कम केली आहे. अनेक आंदोलने, सामाजिक उपक्रम, तसेच सोशल मीडियावरचा वाढता प्रभाव पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीत उबाठाकडून शिट बहाल होण्यासाठी योग्य, सक्षम आणि दर्जेदार व्यक्तिमत्त्व म्हणून सुरेश शेंडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();