सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधव गंगाधर सरपटवार (वय 86) यांचे दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 10.00 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना देवाज्ञा झाली. स्व.सरपटवार सर ह्यांना नुकताच जैताई मातृत्व गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आपल्या साध्या स्वभावामुळे, सामाजिक बांधिलकीमुळे आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे सरपटवार सरांचे वणी परिसरात मोठे दायित्व होते.
अंतिम विधी दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता त्यांच्या राहत्या घरून, शेवाळकर परिसर, वणी येथून मोक्षधाम येथे पार पडणार आहेत.
सरपटवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरात त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.