सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये नवीन ठाणेदार म्हणून एपीआय संतोष मनवर यांनी रुजू होऊन पदभार स्वीकारला आहे. १४ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता त्यांनी शिरपूर पोलिस स्टेशनची सूत्रे हाती घेतली. यापूर्वी ते मुकुटबन पोलिस स्टेशनचे ठाणेदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कामकाजातील काटेकोरपणा आणि काटक मनोवृत्तीमुळे ते ओळखले जातात.
दरम्यान, आतापर्यंत शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार म्हणून कार्यरत असलेले एपीआय माधव शिंदे यांची नियमित बदली प्रक्रियेनुसार जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील वाचक शाखेत नियुक्ती झाली आहे. शिंदे यांनी कार्यकाळात गुन्हे तपासापासून स्थानिक शांतता राखण्यापर्यंत जबाबदाऱ्या सुरळीत पार पाडल्या असून त्यांच्या कामाचे स्थानिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
नवीन ठाणेदारांच्या आगमनामुळे शिरपूर पोलिस स्टेशनच्या कामकाजात नवी ऊर्जा येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.