सह्याद्री चौफेर | योगेश मडावी
झरी–जामणी : आदिवासी बहुल झरी–जामणी तालुक्यात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात आणि अभिमानाने साजरी केली जाते. त्यानुसार माथार्जुन गावामध्येही क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त भारतीय डाक विभाग तसेच शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला भारतीय डाक विभाग, यवतमाळ, यांच्याकडून वणी उपविभागीय डाक निरिक्षक अशोक मुंडे व डाक विभागातील सर्व कर्मचारी, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा माथार्जुनचे मुख्याध्यापक अविनाश मोरे व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.तसेच माथार्जुन गावाचे प्रथम नागरिक सरपंच रवींद्र कायतावर, ग्रामपंचायत सदस्य बाबुलाल किनाके, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नागोराव दडांजे,तसेच सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार योगेश मडावी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर भाषणे,गीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
डाक विभागाच्या उपक्रमांतर्गत गावातील नागरिकांना आर्थिक साक्षरता,बचत योजना आणि विविध सरकारी सेवांची माहिती देण्यात आली.
नोव्हेंबर आदिवासी समाजासाठी गौरवाचा महिना
नोव्हेंबर महिन्याला आदिवासी समाजात विशेष जवळीक असून या महिन्यातील महत्त्वाचे स्मृतिदिन पुढीलप्रमाणे
८ नोव्हेंबर : राघोजी भांगरे जयंती१५ नोव्हेंबर : जलनायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती२६ नोव्हेंबर : आदिम जमातीचे पहिले क्रांतिकारक शामा दादा वाढोडकर जयंती२६ नोव्हेंबर : संविधान दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर
या सर्व स्मृतिदिनांचे ग्रामपातळीवर अभिमानाने स्वागत केले जाते.माथार्जुन येथील कार्यक्रमाने आदिवासी समाजाच्या संघर्षशील इतिहासाची आणि गौरवशाली परंपरेची उजळणी करून सामाजिक एकात्मता व सांस्कृतिक अभिमानाला नवी ताकद दिली,असे सहभागींच्या भाषणातून स्पष्ट झाले.