सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : येथील प्रभाग क्रमांक ५ मधील कार्यकर्त्यांनी मध्यरात्री १ वाजता जटा शंकर चौकातील शिवसेना (शिंदे गट) कार्यालयात पक्ष प्रवेश केला.
वणी नगर परिषदेचे निवडणूक प्रभारी विश्वास भाऊ नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा संघटक विजय चोरडिया, शिवसेना नेते विनोद मोहीतकर, बंटी ठाकूर आणि सचिन देशपांडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. या वेळी सचिन पडोले, संदीप खोब्रागडे, अमर कन्नकुंटलावार, सिद्धू डगावकर, विजय वाढई यांसह अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गट) वर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला.
अलीकडील काळात वणी शहरासह ग्रामीण भागातही शिंदे गटाचा वाढता कल स्पष्टपणे जाणवत असून स्थानिक कार्यकर्त्यांत उत्साहाची लाट दिसत आहे. प्रत्येक प्रभागातून होत असलेला वाढता पक्ष प्रवेश आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची पकड अधिक मजबूत होत असल्याचे संकेत देत आहे.