टॉप बातम्या

महाविकास आघाडी SLOW BUT SURE...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : आजपासून पारंपरिक प्रचार ताफा धडकणार! स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचा बोलबाला वाढत असून आगामी नगर परिषद निवडणुकीचा माहोल आणखी रंगत चालला आहे.

वणीमध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोहोचत असताना आजपासून महाविकास आघाडीचा पारंपरिक प्रचार ताफा आणखी जोरात आहे. प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने समर्थक रस्त्यावर उतरत विविध प्रभागांमध्ये भेटीगाठी, पदयात्रा आणि जनसंपर्क रेलचेल पाहायला मिळत आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीची नगराध्यक्ष उमेदवार डॉ. संचिता विजय नगराळे (गेडाम) ह्या 14 ही प्रभागात वणीकरांशी संवाद साधत आहे. त्यांच्या पाठीशी युवा, महिला, मोठा जनाधार सोबत आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमचा संकल्प आहे आणि हा बदल आता प्रत्येक वणीकरांना अनुभवायला मिळेल.अशा त्या आवर्जून सांगतात.” त्यांच्या या निर्धारामुळे आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();