टॉप बातम्या

वसंत जिनींगच्या अध्यक्ष पदी प्रमोद वासेकर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : दि वसंत जिनिंग संस्थेच्या अध्यक्षपदासाठीची निवड प्रक्रिया आज, २६ नोव्हेंबर रोजी पार पडली. या निवडणुकीत सर्व १३ संचालकांनी पूर्ण एकमताने काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्ते प्रमोद वासेकर यांना अध्यक्ष म्हणून पसंती दिली.

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ वासेकर यांनी काँग्रेस पक्षाशी अखंड निष्ठा राखत संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या दीर्घ सेवाभावाची दखल घेत सतराही संचालक मंडळाने त्यांच्यावर संस्थेच्या नेतृत्वाची धुरा सोपवली. तसेच उपाध्यक्ष जयकुमार आबाड यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. 

वासेकर यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून संस्थेच्या कामकाजात नवी ऊर्जा निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();